वृंदावन मिसळ - पुण्यातील प्रसिद्ध अस्सल महाराष्ट्रीयन मिसळ

जिथे प्रत्येक घासामागे एक गोष्ट आहे

वृंदावन मिसळ ही केवळ खाण्याची जागा नाही, तर चवीतून उलगडणारी एक गोष्ट आहे. पारंपरिक महाराष्ट्रीयन मसाल्यांचा सुवास, ताज्या साहित्याची शुद्धता आणि घरगुती चवीचा अनुभव — यामुळेच आमची मिसळ प्रत्येकाच्या मनात घर करते. पुण्यातील अस्सल मिसळीचा खरा स्वाद येथे अनुभवायला मिळतो.

“आम्ही फक्त मिसळ बनवत नाही — आम्ही आठवणी घडवतो.”

अस्सल महाराष्ट्रीयन रेसिपी

पारंपरिक पद्धतीने बनवलेली, घरगुती चवीची मिसळ.

शुद्ध व दर्जेदार साहित्य

निवडक साहित्य आणि पारंपरिक मसाल्यांचा वापर.

प्रेमाने घडवलेली खास चव

प्रत्येक प्लेटमध्ये आपुलकी आणि  समाधानाची चव.

मोशी, पुणे येथील वृंदावन मिसळ हाऊसचा अनुभव अप्रतिम होता!
कढी वडा अतिशय खमंग, चवदार आणि अप्रतिम होता. वडा पाव तर अगदी लहानपणीची आठवण करून देणारा—खास घरगुती चव! पण सर्वात जास्त मन जिंकले ते त्यांच्या चहाने—नेमक्या पद्धतीने बनवलेला आणि हसतमुख सेवेबरोबर दिलेला. नक्कीच पुन्हा भेट देईन.

प्रिती रामटेक

वृंदावन मिसळ – पुन्हा यायला आवडेल मिसळ पाव चांगली आहे आणि फारशी तिखट नाही. पावची गुणवत्ता खूपच उत्तम आहे, तो नेहमी गरम आणि खुसखुशीत दिला जातो. वडापाव आणि खेकडा कांदा भजी ठीक आहेत. थिक कोल्ड कॉफी फारशी चांगली वाटली नाही, तिला थोडी बिस्किटासारखी चव येत होती. स्पेशल चहा प्रमाणात जास्त आहे, दोन जणांसाठी पुरेसा आहे.

गौरव सांचेती